Dombivali : डोंबिवलीतील प्रसिद्ध DNS बँकेला गंडा, हॅकरकडून दिड कोटी लंपास
Continues below advertisement
डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून दीड कोटींचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातल्या एका ग्राहकानं आपल्या खात्यात अचानक जास्त पैसे आल्याचे निदर्शनास आणून दिलं. याबाबत त्यानं नौपाडा शाखेत तक्रार दिली. या बँकेचे डेटा सेंटर नवी मुंबईतील महापे येथे आहे. आणि महापे येथूनच एका अज्ञात हॅकरने बँकेची दीड कोटीची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement