Gujarat Expressमधून चोरीला गेलेला 25 लाखांचा मुद्देमाल जप्त | ABP Majha

गुजरात एक्सप्रेसमधून दोन जानेवारीला चोरी झालेला पंचवीस लाखांचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शोधून काढला आहे. या प्रकरणात गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून परेश रामाणी नावाच्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोनम रवी मेहता हे दोन जानेवारीला सकाळी सहाच्या सुमारास गुजरात एक्स्प्रेसनं बोरिवलीहून अहमदाबादला जात होते. त्यांची सोनं आणि हिरं ठेवलेली बॅग ट्रेनमधूनच गायब झाली. या ट्रेनला बोरिवलीनंतर थेट सुरतला थांबा होता. त्यामुळं मेहता यांनी सुरत रेल्वे शाखेत जाऊन तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर परेश रामाणीला अमरेलीमधून हुडकून काढलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola