आहेराच्या रकमेतून 60 गरीब कुटुंबांना केले धान्यदान, प्रभादेवीच्या नवविवाहितांची सामाजिक बांधिलकी
Continues below advertisement
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या नवविवाहित तरुणाने आपल्या लग्नसोहळ्यातही माणुसकी धर्म जपत समाजापुढे नवा आदर्श ठेवला. त्याने आपल्या संसाराची सुरूवात करताना मित्रांनी केलेल्या आहेरातून आणि वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबियांना धान्यदानाचे सत्कार्य करून लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं अनोखं उदाहरण लोकांसमोर ठेवलंय ते प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने.
Continues below advertisement