सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मोर्चा, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू
Continues below advertisement
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहुन सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे.
Continues below advertisement