Mumbai : मुंबईतील अवंती-अंबर इमारतीवर तब्बल साडेआठ कोटींची डागडुजी ABP Majha

Continues below advertisement

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही एका शासकीय निवासी इमारतीच्या डागडुजीवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आलाय. आयपीएस, आयएएस आणि काही मंत्री ज्या ठिकाणी राहतात, त्या अवंती-अंबर इमारतीवर तब्बल साडेआठ कोटींची डागडुजी करण्यात आली. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपानुसार अवंती-अंबर या इमारतीच्या छोट्यातल्या छोट्या कारणांसाठी खर्च करण्यात आलाय. एवढंच नव्हे तर जेवढा खर्च कागदोपत्री दाखवण्यात आलाय, तेवढा नक्की करण्यात आला आहे का? अशी शंका आता उपस्थित होतेय. त्यामुळे एकीकडे कोरोना, तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूर यासारख्या स्थितीनं सरकारचं कंबरडं मोडलेलं असताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोट्यवधी खर्चून झालेली डागडुजी आता नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram