Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज

Continues below advertisement

Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज

अभिनेता गोविंदा (Actor Govinda) यांच्याकडून मिसफायर (Govinda Gun Misfire) झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली आहे. 

दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होती. त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंधेरीच्या क्रिटी केयर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. 

गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, गोविंदा यांच्या मुलीनं एबीपी न्यूजशी बोलताना त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गोविंदा यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे चाहते चिंतेत असून गोविंदा यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram