Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता एटीएस करणार

Continues below advertisement

 कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता एटीएस करणार आहे... १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कोल्हापुरात गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती... या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे होता.. मात्र ७ वर्षात तपासात फारशी प्रगती न झाल्यानं तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती... त्या विनंतीला मान देत मुंबई उच्च न्यायालयानं हा तपास एटीएसकडे सोपववला आहे... एटीएसकडे या तपासाची कागदपत्र आली असून... एटीएसच्या पुणे युनिटची टीम या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं कळतंय... पानसरे हत्याप्रकरणी आत्तापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे मात्र मुख्य २ आरोपी अद्यापही फरार आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram