ST Strike : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती
Continues below advertisement
परिवहन मंत्री अनिल परब अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे एसटी संपासंदर्भात आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपासंदर्भात संध्याकाळी 6 वाजता मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि परब यांच्यात बैठक झाली असून त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणारे आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याची माहिती आहे. असं झाल्यास पगारवाढीमुळे सरकारवर 600 कोटींचा भार येणार आहे.
Continues below advertisement