Ghatkopar Hording Update : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 40 तास उलटले तरीदेखील शोधकार्य सुरुच
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून ४० तास उलटले तरीही शोधकार्य सुरूच आहे. लोखंडी ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे, त्यामुळे क्रेनच्या सहाय्यानं हा ढिगारा बाजूला करून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, ढिगा-यातून काढलेलं भंगार गैस कटरनं कापून वेगळं केलं जातंय. अपघात झाला तेव्हा जमिनिखालच्या टाक्यांमध्ये हजारो लीटर इंधन असल्यानं गॅस कटर वापरता येत नव्हते. आता मात्र सगळं इंधन रिकामं करण्यात आलं आहे.