Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणी

काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांचा आकडा १४वर गेला आहे.  दरम्यान, ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आता मधले दोन गर्डर उचलले जाणार आहेत, त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे, ती पडताळून बघितली जाणार आह, अशी माहिती NDRFनं दिली आहे. NDRF च्या दोन टीम सध्या कार्यरत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola