Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईसाठी प्राथमिक पाहणीसाठी बीएमसीची टीम घटनास्थळी
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता मुंबई महापालिकेला जाग आली आहे. घाटकोपर परिसरातील इतर अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाणार आहे, त्याच्या प्राथमिक पाहणीसाठी बीएमसीची टीम पोहोचली आहे. एकूण तीन होर्डिंग्ज आहेत, हे तिन्ही रेल्वेच्या जागेवर आहेत, ते काढण्यासाठी एक पूर्ण दिवस लागणार आहे. दुर्घटना होण्याआधी बीएमसीनं जर ही पाहणी केली असती तर १४ जणांचे जीव वाचले असते अशी प्रतिक्रिया संतप्त मुंबईकर देतायेत.