Ganpati Visarjan 2022 : पाच दिवसांचा बाप्पाचं आज विसर्जन, पालिकेकडून 10 कर्मचारी 786 जीवरक्षक तैनात
abp majha web team
Updated at:
04 Sep 2022 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेले पाच दिवसांपासून गणेशोत्सवाची देशभर धूम सुरू आहे. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस. आजच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. समुद्रकिनारे आणि विसर्जनस्थळी पालिकेनं सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंगदेखील करता येणार आहे. आजच्या विसर्जनाच्या निमित्तानं पालिकेचे 10 हजार कर्मचारी आणि 786 जीवरक्षक मुंबईत तैनात असतील. समन्वय साधण्यासाठी विसर्जनस्थळी स्वागत कक्षही उभारण्यात आले आहेत.