Ganeshotsav 2022 : गणपत्ती बाप्पा थेट BEST Bus मध्ये झाला विराजमान, घरघुती गणेशोत्सवाचा देखावा
Continues below advertisement
घाटकोपरच्या गोपाळ भवनमधील वरिया कुटुंबाचा बाप्पा दरवर्षी खास असतो. यावर्षी त्यांचा बाप्पा 'बेस्ट' बाप्पा आहे. कारण हा बाप्पा चक्क डबल डेकर बेस्टच्या बसमध्ये विराजमान झाला.राहुल वरिया यांनी गेल्या वर्षी लोकल ट्रेन मध्ये बाप्पा साकारला होता. मिनियेचर आर्ट पद्धतीनं साकारलेला देखावा हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. अप्लाईड आर्टसचे शिक्षण घेतलेल्या राहुल वरिया यांनी यंदा मिनियेचर आर्ट मधून बेस्ट बस साकारलीय. सुमारे चार फूट लांब आणि तीन फूट उंच अशी ही बस छोट्या छोट्या बारकाव्यांसह तयार करण्य़ात आलीय. यात विराजमान असलेली गजमुख मूर्ती देखील त्यांनीच घरी साकारली आहे. पाहूयात
Continues below advertisement