Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुका काढण्यास बंदी, चौपाट्यांवर विसर्जनाला परवानगी : BMC

मुंबई : गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावटं होतं. त्यामुळे गेल्यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा यासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. यामध्ये गतवर्षीच्या नियमवाली कायम राहील असं ठरलं आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करुन वरीष्ठ पातळीवर घेण्यात येईल. 

सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट, तर घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी. तसेच गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांनी घ्यावी, अशा अटी असणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola