Ganesh Chaturthi 2021 : दादरच्या फूल बाजारात मुंबईकरांची मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ
Continues below advertisement
उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. तर आज हरतालिका आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत गणपती बाप्पाचं आगमन होण्यास सुरुवात होईल. मात्र यामुळे अगदी सकाळपासून दादर मार्केटमध्ये गर्दी झालेली आहे. फुलं,डेकोरेशनचं साहित्य, पूजेचं साहित्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणत दादर मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाचे आकडे वाढलेले आहेत. अशात ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे.
उद्या गणेश चतुर्थी आणि आज हरितालिका. यामुळे दादरच्या फुल मार्केटमध्ये पहाटेपासून गणेश भक्तांनी फुलं खरेदीसाठी हजेरी लावली आहे. मात्र कोरोना, पाऊस, मंदिर बंद, लोकल बंद यांचा फटका फुल मार्केटला बसल्याचं फुल व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपेक्षा आज फुलांची किंमत वाढलेली आहे.
Continues below advertisement