Ganesh Chaturthi 2021 : बाप्पासाठी कोस्टल रोडचा देखावा; मुंबईच्या दीपक मकवाना यांची कलाकृती
Ganesh Chaturthi 2021 : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आज गणेश चतुर्थी, घराघरांत गणरायाचं आगमन होणार असून गणपतीची भक्तीभावानं प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारण्यात येत असतात. अशातच सांताक्रुज पूर्वमधील दीपक मकवाना यांनी मुंबईचा चेहरा ज्या एका मार्गाने बदलणार आहे, त्या सागरी मार्गाचा, म्हणजेच, कोस्टल रोडचा देखावा साकारला आहे.