Gajanan Kirtikar : ना नगरसेवक, ना आमदार...डायरेक्ट खासदार, लेका विषयी किर्तीकरांचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील 6 मतदारसंघात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झालं. या मतदारसंघातील निवडणुकांकडे यंदा राज्याचे लक्ष लागले होते. कारण, शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच सर्वात मोठी निवडणूक होती. त्यामुळे, मुंबईतील मदारसंघात केवळ ठाकरे विरुद्ध भाजपा असाच सामना नव्हता. तर, ठाकरे विरुद्ध, शिंदे आणि भाजपा असा सामना रंगला होता. त्यामुळे, ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली ही निवडणूक आहे. त्यातत, येथील दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना रंगला आहे. यंदा केवळ शिवसेना कार्यकर्तेच एकमेकांविरद्ध मैदानात उतरले नव्हते. तर, कुटुंबातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यातूनच, उत्तर-पश्चिम मुंबई (Mumbai) मतदारसंघात लेक उमेदवार असातना बाप विरोधात प्रचार करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, लेकासाठी प्रचार न केल्याची खंत अखेर वडिल गजानन कीर्तीकर (Gajanan kirtikar) व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram