Lalbaug : सतत लागणाऱ्या आगींबद्दल अग्निशमन दलाचे माजी अधिकारी प्रताप करगुप्तीकर यांचे मत
मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. आगीच्या घटनेनंतर यंत्रणा कशी राबवावी या बद्दल अग्निशमन दलाचे माजी अधिकारी प्रताप करगुप्तीकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.