Mumbai : राज्यातील लोककलावंतांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु
Continues below advertisement
राज्यातील लोककलावंत आपल्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. शासन दरबारी लोककलावंत गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या घेऊन जातात, मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे लोककलावंत संतप्त झालेत त्यामुळेच लोकनाट्य लोककलावंत मराठी परिषदेच्या नेतृत्वात अनेक कलावंत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आता मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीए.
Continues below advertisement