Flower Rates Hike : आवक घटली, फुलं महागली, फुलांचे भाव वधारल्यानं ग्राहकांना फटका
Continues below advertisement
मार्गशीर्ष महिन्यात फुलांना मोठी मागणी असते. पण यंदा फुलांचे भाव दुपटीनं वाढलेत. त्यामुळे कल्याणच्या फूल बाजारातील निम्म्या गाळ्यांना तर टाळं लागलंय. अवकाळी पावसामुळे नगर, पुण्यातील फुलशेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे फुलांची आवक घटली. परिणामी दर वाढले, मार्गशीर्ष महिन्यात ५० ते ६० रुपयांनी मिळणारा झेंडू १०० ते १२० रुपये प्रतिकिलोनं विकला जातोय.
Continues below advertisement