Fire | मुंबई मेट्रोच्या असल्फा स्थानकाजवळ थिनरच्या कारखान्याला भीषण आग | ABP Majha
मुंबई मेट्रोच्या असल्फा स्थानकाला लागून असलेल्या खैराणी रोडवर थिनरच्या कारऱखान्याला भीषण आग लागलीय. ही आग एवढी भीषण आहे की दूरदूरवरुन धुराचे लोट दिसताहेत. थिनरच्या पिंपाचा स्फोट झाल्यानं आग भडकल्याचं कळतंय. गेल्या पाच तासांपासून ही आग धुमसतीच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. या आगीमुळं मोठाले ड्रम हवेत उडून स्फोट होताना दिसले. त्याचबरोबर थिनर गटारात वाहून आल्यानं गटारातूनही आगीच्या ज्वाळा भडकताना दिसल्या.