
Sakinaka Fire | मुंबईत साकीनाका येथील 90 फूट रस्त्यावर गोदामांना भीषण आग
Continues below advertisement
मुंबई : साकीनाका येथील 90 फूट रस्त्यावर गोदामांना भीषण आग लागली आहे. ही गोदामे टिश्यू पेपरची असल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र तीन गोदामे आणि एक घर जळून खाक झालं आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement