Sourav Ganguly | सौरव गांगुली राजकीय मैदानात? पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेतली. दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरु लागल्या आहेत. परंतु राजभवनशी संबंधित सूत्रांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. राज्यपाल जगदीप धनखर म्हणाले की सौरव गांगुली यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. गांगुली यांनी ईडन गार्डन्स मैदान पाहण्याचं आमंत्रण दिलं होतं, जे स्वीकारलं आहे.