FIR Against Worli Pub | वरळीतील 'त्या' पबवर गुन्हा दाखल; तात्पुरत्या स्वरुपात परवाना रद्द
मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतळ्या एका पबमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच रात्री उशिरापर्यंत पब आणि हॉटेल चालत आहेत. नियमांचं उल्लंघन केलं केलं जातंय. त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला होता.