Kirit Somaiya | ठाकरेंच्या अत्यंत जवळील एका मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार : किरीट सोमय्या
मुंबई : किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले असून प्रताप सरनाईक प्रकरणी काही महत्वाचे पुरावे देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या आठवड्यात शिवसेनेच्या आणखी एक मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. हा मंत्री ठाकरे कुटुंबियांच्या जवळचा मंत्री असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.