Final Year Exams | मुंबई विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा सुरु, यशस्वी आयोजनासाठी तज्ज्ञांची समिती
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ट झाले होते. बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समुह तयार केले आहेत. दरदिवशीच्या परीक्षांविषयक घडामोडी आणि अनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली आहे.