मुंबई अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा
तिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार की नाही हा तिढा सुटल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मुंबई लोकल मधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी आज देण्यात आली आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीला रेल्वे बोर्डाने मंजुरी देऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात सूचना केल्या आहेत.