Farmers Long March : शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द

Continues below advertisement

नाशिकमधून निघालेलं लाल वादळ एक एक पाऊल मुंबईकडे टाकतंय. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. यावर आज शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दुपारी तीन वाजता बैठक होणार होती.. मात्र ही बैठक आता उद्या दुपारी होणार आहे. याचं कारण म्हणजे, आज सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे.. आणि त्यामुळे आजची बैठक आणि त्यातील होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार, असा पेच सरकारसमोर आहे.. मात्र किसान सभेचे नेते अजित नवले यांनी बैठक पुढे ढकलण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकार बेजबाबदारपणे वागू शकत नाही.. बैठकीची नवी वेळही आम्हाला कळवण्यात आलेली नाही, असं नवले म्हणाले.. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram