ST Strike : आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आक्रमक, अनिल परबांच्या घराची सुरक्षा वाढवली
मुंबई : एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकरऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.
अनिल परब आणि कर्मचारी संघटनांसोबत बैठक सुरु असून त्यामध्ये कर्मचारी संघटना या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
Tags :
Anil Parab ST Workers ST Workers Strike Gopichand Padalkar St Workers Sadabhau Khot ST Workers Kirit Somaiya ST Workers