Vikram Ghokhale | पुण्याजवळील 2 एकर जमीन दान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी बातचीत
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं समाज भान आपण सगळेच जाणतो. समाजातल्या विविध घटकांना वेळोवेळी विक्रम गोखले यांनी मदत केली आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांच्याकडून त्यांनी हा मदतीचा वसा घेतला आहे. आता सध्या कोरोनाने वेढलेल्या परिस्थितीतही गोखले यांनी दातृत्वाचा धडा घालून दिला आहे. त्यांनी पुण्याजवळच्या नाणे गावातली आपली दोन एकर जागा दोन वेगवेगळ्या संस्थांना दान करत असल्याचं जाहीर केलं आहे.