राज ठाकरेंचा मावळा उद्धव ठाकरेंच्या दरबारात; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य शिरोडकर 'माझा'वर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आदित्य शिरोडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचा भगवा शेला बहाल केला, तर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या हातात शिवसेनेचा भगवा झेंडा दिला. युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे हेही याप्रसंगी उपस्थित होते.
Tags :
Shiv Sena Amit Thackeray Raj Thackeray MNS Aditya Shirodkar MNS Youth Wing EXCLUSIVE Aditya Shirodkar