Mumbai Local : लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन डोस घेणं आवश्यक : राज्य सरकार
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासासाठी आता दोन डोस घेणं आवश्यक आहे. दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्यांनाच आता रेल्वेचा लोकल प्रवास करता येणार आहे. वैद्यकीय कारणास्तव लस घेऊ न शकलेले नागरिक आणि वृद्ध यांनाच लोकल प्रवासासाठी लसीकरणाची अट ठेवण्यात आलेली नाही. राज्य सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार लोकल प्रवासासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच मासिक किंवा त्रैमासिक पास दिला जाणार आहे.
Tags :
Mumbai Local Local Train Local Railway Rules Doses In Railway Essential Workers Two Dose Compulsion