Nawab Malik यांना मिळालेल्या पत्राची NCB चौकशी करणार, NCB उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांची माहिती

Continues below advertisement

Nawab Malik vs Sameer Wankhede : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी एका अज्ञात एनसीबी आधिकाऱ्याकडून मिळालेलं पत्र ट्विटर पोस्ट केलं आहे. या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं असून एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram