CSMT QR Code Scan | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू-आर कोड पाहून सीएसएमटी स्थानकात प्रवेश
Continues below advertisement
क्यूआर कोड पाहून मग स्थानकात प्रवेश देण्याची डेडलाईन जरी पुढे ढकलण्यात येत असली तरी हे क्यू आर कोड स्कॅन करण्याचे मशीन मात्र मध्य रेल्वेने तयार केले आहे. सीएसएमटी स्थानकात हे मशीन बसवण्यात आले असून, ज्यांच्या कडे क्यूआर कोड आहे त्यांना या मशीन समोर ते स्कॅन करावे लागतात. जर सर्व माहिती बरोबर असेल तर हे मशीन हिरवा कंदील दाखवते, नाही तर लाल निशाण येते. त्यावरून तिथे असलेल्या आरपीएफ किंवा जीआरपीच्या कर्मचाऱ्यांना स्थानकात कोणाला प्रवेश द्यावा आणि कोणाला देऊ नये हे लक्षात येते. मध्य रेल्वेने असाच एक पायलट प्रोजेक्ट काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुरू केलाय.
Continues below advertisement