Maharashtra :दुष्काळग्रस्तांना मदत नाहीच? नवं सरकार येईपर्यंत आचारसंहिता कायम,निवडणूक आयोगाचा निर्णय

Continues below advertisement

मुंबई: जोपर्यंत नवीन लोकसभा स्थापन होत नाही तोपर्यंत आचारसंहितेमध्ये (Model Code Of Conduct) शिथिलता दिली जाणार नाही अशी महत्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर लोकसभा स्थापन होईल आणि त्यानंतर आचारसंहितेमध्ये शिथिलता दिली जाईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक काही घोषणा किंवा निर्णय राज्य सरकारला घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेण बंधनकारक राहणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार असा प्रश्न आता राज्य सरकारसमोर आहे. 

देशात सात टप्प्यात मतदान होत असून सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून निकालानंतर आचारसंहिता हटवण्यात येईल अशी चर्चा होती. पण त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. तसेच या काळात राज्य सरकारला कोणतेही मोठे निर्णय घेता येणार नाहीत, जर काही अत्यावश्यक निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram