Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

Continues below advertisement

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू 

हेही वाचा : 

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मोठं यश मिळवलं आहे. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाच्या शपथविधीची मोठी तयारी सुरू झाली आहे. अशातच आता मंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदावरून अद्याप महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहेत. एकीकडे महायुतीतील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ताप आणि घशाला संसर्ग झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व बैठका, भेटीगाठी रद्द केल्या आहेत, अशातच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.

एकनाथ शिंदे ठाण्यात तर अजित पवार दिल्लीत

दोन-तीन दिवस आपल्या मुळगावी दरे येथे गेलेले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रविवारी ठाण्यातील निवासस्थानी परतले. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांची प्रकृती सुधारली नसल्याची माहिती आहे, त्यांना ताप, सर्दी, घशाला संसर्ग झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर शिंदे भेटी टाळत असल्याच्या चर्चांसोबत ते नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी दरे गावात माध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांवर आपलं मत स्पष्ट केलं. तर अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram