Shinde-Fadnavis Cabinet Expansion:सेनेच्या वर्धापन दिनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता असून, हा होणारा विस्तार छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. दिल्लीतूनच तसे आदेश शिंदे-फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. तसेच जी उरलेली १३ रिक्त मंत्रिपदे असतील ती ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय. विशेष बाब म्हणजे हा छोटेखानी विस्तार केल्यानंतर काही इच्छुकांची महामंडळावर बोळवण होऊ शकते.