Eknath Shinde on Mumbai Potholes : मुंबईतील रस्ते दोन वर्षात खड्डेमुक्त करणार,मुख्यमंत्र्यांची घोषणा

Continues below advertisement

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यावेळी माहिती देताना व्यक्त केला. सध्या 236 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर 400 किलोमीटरची कामे प्रस्तावित आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram