पावसाळी अधिवेशन वादळी होणार! अधिवेशनात विरोधक सरकारला 'या' आठ मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता

Continues below advertisement

Maharashtra assembly monsoon session 2020 : महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे. राज्याच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाले आहेत पण जे 60 वर्षांत घडलं नाही, ते आपल्याला आता घडताना दिसत आहे, असं फडणवीस म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram