अमरावतीमध्ये कोरोना, मेंदूज्वर झालेल्या विद्यार्थिनीचा पुनर्जन्म, 15 दिवसांनी कोमातून बाहेर
अमरावती : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर आणि इतर आजारांचे लक्षणे आढळून आलेल्या एका विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचारामुळे तिला पुनर्जन्म मिळाला आहे. उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या आणि त्यानुसार तत्पर औषधोपचारामुळे आज ती पूर्णत: बरी होऊन स्वत:च्या घरी परतली. आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबिय आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे..