Varsha Raut | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीची नोटीस; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नोटीसनुसार 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे.