Raj Kundra प्रकरणी ईडी तपास करण्याची शक्यता, मुंबई गुन्हे शाखेकडून ईडीला एफआयआर काॅपी सुपूर्द
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
27 Jul 2021 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Kundra Police Custody : पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला 19 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा याच्यावर पॉर्न व्हिडीओ बनवून पब्लिश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोर्टानं राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोठडीत वाढ करण्यात आली होती. आज कोर्टानं राज कुंद्राला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.