Dilip Walse Patil on Central Agencies: ED, CBI मुळे राज्य सरकार अस्थिर होणार नाही : दिलीप वळसे पाटील

Continues below advertisement

मुंबई : अमरावती हिंसाचारामागे जर राजकीय पक्षाचा हात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हिंसाचारामागे असणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची किंवा अकादमीची तपासअंती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये झालेले दंगे असतील किंवा परमबीर सिंह यांना फरार घोषित या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

बांग्लादेशमध्ये काहीतरी घटना घडते. मग एखादी संघटना माहारष्ट्रात बंदचे आवाहन करते. त्यानंतर राजकीय पक्षांच्या बंदची हाक दिली जाते, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना  कोणत्या हेतूने  घडवल्या जातात या संदर्भात चौकशी सुरू आहे.  चौकशीत एखादी व्यक्ती, पक्ष, संघटना दोषी आढळल्यास  संबंधतिवार कारवाई करण्यात येणार आहे. 

रझा अकादमीवर कारवाई होणार का?  या प्रश्नाला  उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले,  रझा अकादमीवर बोलणे लवकर होईल. पोलिस तपास करत असून दोषी ठरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मोर्चे काढण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. हो मोर्चे स्वयंघोषिच होते. लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या मोर्चांमार्फत करण्यात आलेला आहे.  

विरोधी पक्षाकडे जर काही  माहिती असेल तर ती आम्ही  तपासू

 सरकारने समर्थन दिलेले मोर्चे आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला यावर म्हणाले, या वक्त्व्यामध्ये सत्य नाही, यामध्ये काही तथ्य नाही. तशी कोणत्याही प्रकराची माहिती मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस  हे जबाबदार नेते आहे. त्यांनी वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विरोधी पक्षाकडे जर काही  माहिती असेल तर ती आम्ही  तपासू .

परमबीर सिंह हे सध्या कुठे आहेत हे माहित नाही म्हणून त्यांना फरार घोषित 

परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानंतर ते चौकशीला उपस्थित राहिले नाही. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. परमबीर सिंह हे सध्या कुठे आहेत हे माहित नाही म्हणून त्यांना फरार घोषित केले आहे. परमबीर सिंह हे पोलिसांचे प्रमुख राहिले आहे. त्यांनी पत्र लिहिली त्यानंतर त्यानंतर माझ्याकडे पुरावे नाही हे सांगणे मुळात संशयास्पद आहे. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंह यांनी आरोप केले आहे. 

केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून राज्यातील सरकार  अस्थिर करण्याचा प्रयत्न

केंद्रीय तपास संस्थांचा वापर या अगोदर केंद्राच्या कोणत्याही सरकारने केलेला नाही.  केंद्रीय तपास संस्थांचा राज्यातील प्रकरणात हस्तक्षेप जास्त वाढलाय. या सगळ्या संघनटेचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाता असेल तरी महाविकास आघाडीला कोणत्याही आघाडीला प्रकारचा धोका नाही. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram