Mumbai Jijamata Udyan Rush : मुंबईतील जिजामाता उद्यानात काल 25 हजारांवर लोकांची हजेरी, ठाकरेंचा टोला

Continues below advertisement

मुंबईत भायखळ्याच्या जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयात काल २५ हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली आणि एका दिवसात ९ लाख ५७ हजार रुपये महसूल मिळाला.  सोमवारीही तिथं २० हजारांवर पर्यटकांनी भेट दिली. यावरून आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावलाय. मुंबई महापालिकेत आम्ही केलेल्या कामाचा अभिमान आहे. वीर जिजामाता उद्यानातील वाघ, बिबटे आणि पक्षी शहराला महसूल मिळवून देतायत याचा आनंद आहे.... आणि पेंग्विनलाही विसरू नका... त्यांच्यामुळे प्राणीसंग्रहालयाला अधिक महसूल मिळतोय, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. या प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणण्याची कल्पना आदित्य ठाकरे यांचीच होती. आणि त्यावरून पेंग्विन सेना असा उल्लेख करत भाजपचे नेते ठाकरेंवर टीका करतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram