Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा ब्लास्ट, पुन्हा आगडोंब

Continues below advertisement

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा ब्लास्ट, पुन्हा आगडोंब

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत बुधवारी सकाळच्या सुमारास  स्फोट होऊन भीषण आग (Dombivli Fire) लागली. आग लागताच इंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तात्काळ कंपनी बाहेर आल्याने मोठी जीवित हानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. 

गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात 16 कामगार मयत झाले आहेत. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप सावरले नसताना बुधवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कार्यालये सुरू होत असतानाच इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीतील रासायनिक ज्वलनशील वस्तुंना आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. इंडो अमाईन्स कंपनीत शेतीविषयक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीने लपेटताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram