Ulhasnagar Local Accident | उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ लोकलमधून पडून तरुण जखमी | ABP Majha
लोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगरमध्ये लोकलमधून पडून तरुण जखमी झाला आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (17 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश गायकवाड असं या तरुणाचं नाव असून तो लोकलच्या दरवाजात उभा होता. लोकल उल्हासनगर स्थानकात येत असतानाच अचानक दिनेशचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात दिनेशच्या डोक्याला इजा झाली असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.