Nagpur Mayor | नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, महापौर थोडक्यात बचावले | ABP Majha
Continues below advertisement
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात जोशी आणि त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. रात्री साडेबाराच्या आसपास महापौर संदीप जोशींवर हल्ला झाला. जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने ते निवडक मित्रांसह आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. परत येत असताना जोशी यांच्या फॉर्च्युनर कारवर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी जोशींच्या कारवर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. गेल्या 12 दिवसांपासून महापौर संदीप जोशी यांना धमकीची पत्रं येत होती. त्याचाच संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Continues below advertisement