Dog Brutally Killed : संतापजनक! उल्हासनगरात कुत्रीसह पिल्लाला झाडाला लटकावून फाशी

उल्हासनगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलाय. कुत्रीसह तिच्या पिल्लाला झाडाला लटकवून गळफास दिल्याचा प्रकार उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरात समोर आलाय. पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या सृष्टी चुग यांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी साईनाथ कॉलनी परिसरात धाव घेतली. कुत्री आणि तिचं पिल्लू मृतावस्थेत आढळल्यानं त्यांचं शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलं. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola