Diwali 2021 : जनतेला 'लक्ष्मी' पावली ; इंधन स्वस्त, कर्जही स्वस्त, प्रवास सुकर ABP Majha

मुंबई : दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.  

केंद्राचा निर्णय आल्यानंतर भाजप शासित राज्यांपैकी गोव्याने व्हॅट कपात केली आहे. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. आता अन्य भाजपशासित राज्य काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता केंद्रानं कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वॅट कपात कधी करणार  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola