ST workers strike : ST महामंडळ कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत संप करण्यास मनाई :मुंबई उच्च न्यायालय
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाची घोषणा केली होती, पण मुंबई उच्च न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत संप करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास टळला आहे. या मुद्यावर हायकोर्टात आज पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारच्या सेवेत समावेश करावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. त्यासाठी बुधवार रात्रीपासून संपाची घोषणा करण्यात आली होती. दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप केल्यास प्रवाशांचे हाल होतील असं एसटी महामंडळाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. त्यानंतर न्यायालयानं संप करण्यास मनाई केली.